प्रसंग बाका होता. सत्तेमध्ये असलेल्यांचा तो सत्कार होता. लोकांची कामे केली. अडचणी आल्या तरी मागे बघता जोमाने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा तो सत्कार होता. त्या कार्यक्रमाला माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सुनील केदार यांची अनेक भाषणे आजवर ऐकली. एक राजकारणी म्हणून त्यांच्या भाषणाला प्रचंड टाळ्या पडतात. म्हणूनच ते पाचव्यांदा आमदारकीसाठी निवडून येतात. त्यांच्यातील राजकारणी चोवीस तास त्यांच्यात असतो. चोवीस तास राजकारण आणि समाजकारण करणारे हे व्यक्तीमत्त्व आहे.
मात्र, आजचे त्यांचे भाषण हटकेच होते. लोकप्रतिनिंधीसमोर झालेले भाषण अगदी छोटेखानी होते. भाषणात आवेश नव्हता. पण,प्रत्येकाला गंभीर केले. अगदी जिवाला भिडणारा विषय त्यांनी मंचावर निवडावा, ही त्यांची समयसूचकता ह्दयस्पशून गेली. भाषणाचा विषय होता. अधिकार आणि कर्तव्य. भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांची व्याख्या केली आहे. प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांवर त्यांनी मार्मिक भाषेत विश्लेषण केले. अधिकार मागतात. पण, कर्तव्याची कोणालाही जाणीव नाही. कर्तव्य नसेल तर अधिकाराचा काही उपयोग नाही. अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. एक नसेल तर दुसरी अपूर्ण, असे ते सांगत होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी कर्तव्य करावे. सोबत अधिकार आपोआपच मिळतील. अधिकार हे मागणी करून मिळत नाही. कर्तव्यासोबतच ते येतात. सध्या कर्तव्याचा सर्वांना विसर पडल्याचे त्यांनी सांगितले. जगातील सर्वाधिक लोकशाही असलेला भारत देश. तिसरी महाशक्ती बनण्याच्या वाटेवर आहे. पण,सध्या लोकशाही धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाराचे हनन होत असल्याचे ते म्हणाले. कर्तव्य सोडून अधिकाराची मागणी करणारी प्रवृती वाढली आहे. लोकशाहीचे चारही खांब धोक्यात आले आहेत. यातून अधिकार शाबूत राहणार नाही. पर्यायाने लोकशाही राहणार नाही. असा त्यांच्या भाषणाचा रोख होता. १० ते १५मिनिटांच्या भाषणात त्यांनी राज्यघटना समजावून सांगितली. लोकशाही सांगितली. आणि अधिकार व कर्तव्यही सांगितले.
आमदार सुनील केदार हे डॅशिंग आहेत हे सर्वांच माहीत आहे. अधिकारीही दोन हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कार्यकर्त्याचीही ही अवस्था. सांगितलेले काम पूर्ण झाले नाही तर ते फैलावर घेतात. कामपूर्ण होईस्तोवर पाठपुरावा करतात. शब्द दिला की ते फिरवित नाही ही त्यांची खासियत. म्हणूनच गेल्या काही वर्षांत नागपूर जिल्ह्यातील नव्हे तर कॉग्रेसचे राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी आहे. वडील बाबासाहेब केदार. विदर्भातील सहकार चळवळीचे पितामह. गावागावांत त्यांनी सहकार चळवळ रुजविली. पक्ष कोणताही असली तरी बाबासाहेबांचे नाव आदराने घेतले. तोच वारसा त्यांच्या अंगी आहे. वडिलांपेक्षाही ते मुठभर सरस आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसची इभ्रत वाचविली. जिल्हा परिषद खेचून आणली. आणि पदवीधर मतदारसंघात कधी नव्हे अशी क्रांती केली. गेल्या काही वर्षांत त्यांच्या राजकारणात प्रगल्भता आली. ते मतदारसंघापुरते काम करीत नाही.
विदर्भपातळीवर त्यांचे काम आहे. त्यांच्यातील खरा संविधानप्रेमी त्या कार्यक्रमात बघितला. संविधान सांगणे साहित्यिकांचे काम. राजकारणी फक्त संविधान वाचवा सांगतात. पण, त्यांनी मूळ मुद्द्यालाच हात घातला. त्यांच्यातील देशप्रेमी खऱ्या अर्थाने बाहेर निघाला. कर्तव्य आणि अधिकार सांगणे सोपे काम नाही. मात्र, त्यांनी १० मिनिटांच्या भाषणात सोप्या भाषेत सांगितले. हे भल्याभल्यांनाही जमत नाही. आतापर्यंत चांगला राजकारणी म्हणून चाहता होतो. आता संविधानप्रेमी म्हणून नवी ओळख करून देताना छाती हर्षाने फुलून येते. इतर राजकारणी लोकांनाही त्यांचा बोध घ्यावा. राजकारणापलिकडे प्रत्येकाने देशाचा विचार केला पाहिजे. लोकशाही टिकली तर आपण टिकू... अन्यथा गुलामगिरी जवळच आहे... दार उघडण्याची वाट पाहत…. त्यामुळे केदार साहेब, दाद द्यावी तेवढी कमीच!

-चंद्रशेखर रामदास महाजन
प्लॉट क्र. ५९, जनसेवा हाउसिंग सोसायटी,
भारत गोडावूनच्या मागे, नीलकमलनगर,
नरसाळा रोड, नागपूर.
मो. ९८५०२०९७१०

No comments:
Post a Comment