Pages

Sunday, 19 April 2015

बाबासाहेबांचा विराेधी काेण?



14 एप्रिल 2015 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी झाली. गावागावांमध्ये आपल्या लाडक्‍या आणि महाननेत्याला कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी लाेक जमले. त्यांनी पुष्पगुच्छ वाहून त्यांना आदरांजली वाहीली. राज्य सरकारने बाबासाहेब आंबेकडर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन केले. सप्ताहात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. आणि त्यांना आदरांजली वाहीली. मात्र, ऐवढे सर्व असतानाही एक बाब मात्र, खटकली. केंद्रात कोणाची सत्ता असली तरी 14 एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून बाबासाहेबांना अभिवादनपर जाहीरात सर्व वर्तमापत्रात पहावयास मिळत होती. मात्र, यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने एकाही वृत्तपत्रात जाहीरात प्रकाशित झाली नाही. नागपूरच्या काही मुख्य वृत्तपत्रात केंद्र सरकारची जाहीरात नव्हतीच.
बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली. हे सर्वांच नाही आहे. हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. केंद्रात ते पहिले कायदामंत्री होते. बलाढ्‌य असे शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ होते. तरीही केंद्राची त्यांना आदरांजलीपर एकही जाहीरात नागपुरातील वृत्तपत्रात प्रकाशित झाली नाही. अशा महान नेत्याच्या आदरांजलीपर जाहिराती वृत्तपत्रही दरवर्षी प्रकाशित करतात. मात्र, यावर्षीच असे का झाले ते समजले नाही. मोदी सत्तेवर आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती, भाजपने साजरी केली. संघानेसुध्दा विशेषांक काढून त्यांना आदरांजली वाहिली. मात्र, केंद्र सरकारने अभिवादनाची साधी ओळही माध्यमांना दिली नाही. दिली असेल तर नागपुरातील मुख्य वृत्तपत्रात ती उमटली नाही. दोघांपैकी एक नक्‍कीच खोटारडला आहे. तो आंबेडकरविरोधी आहे. दुसरी बाजू ही की, वृत्तपत्रामध्ये राज्य सरकारने सात दिवस समता सप्ताहाच्या दिलेल्या सर्व जाहीरात प्रकाशित झाल्या. माध्यमाने त्या चांगल्या उमटविल्या सुध्दा. म्हणजेच यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यम विभागाने वृत्तपत्रांना अभिवादनपर किंवा आदरांजलीपर जाहीराती दिल्या नाही, असा यातून सूर निघतो. सरकारच्या लक्षात आले नाही, असे असू शकत नाही. हा जाणून बुजून केलेला प्रकार आहे. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंबेडकरविरोधी असल्याचे सांगण्यासाठीच सरकारच्या माध्यमविभागाने अशा जाहिराती दिल्या नाही, असाही सूर अाहे.
नरेंद्र माेदी पंतप्रधान झाल्‍यापासून ते मागासविराेधीत आहेत, हे सांगीतल्‍या जाते. अनेकदा त्‍यांच्या कृतीत ते  लक्षातही येते. नुकताच देशाचा अथ्‍ार्ा संकल्‍प जाहीर झाला. ३२ हजार काेटी रुपयांच्या निधीची कपात अादिवासी व मागासवर्गीच्या याेजनांमधून केली. या समाज घटकाला मुख्य प्रवाहात अाणण्यासाठी माेठ्‌या निधीची गरज अाहे. काॅँग्रेस सरकारनेही त्‍यात माेठी वाढ केली असे नाही. मात्र, त्‍यांनी कपात केली नाही हे गेल्‍या १० वर्षातील चित्र. माेदींना विकासाच्या नावाने सत्‍तेवर बसविले. यामुळे सर्व घटकाचा विचार करून माेठा निधी उपलब्‍ध्‍ा करून नव्या विकास याेजना राबवतील असा आशावाद हाेता. मात्र, त्‍यांनी ३२ हजार काेटीच्या विकास निधीची कपात केली. यामुळे त्‍याचा मागासवर्गाबाबतीतील दृष्‍टीकाेन दिसून येताे. महाराष्‍ट्रातील इंदूमिलचा प्रश्‍न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागला. लंडन येथील स्‍मारकाचा प्रश्‍न मार्गी लागताेय. यामुळे थाेडी प्रतीमा सुधारण्याचा प्रयत्‍न हाेताेय. मात्र, यातून ते बाबासाहेब विराेधी नाहीत, हे स्‍पष्‍ट हाेत नाही. माेदी पंतप्रधान झाल्‍यानंतर त्‍याच दरम्‍यान दिल्‍ली येथील बाबासाहेब संशाेधन केंद्राचा प्रश्‍न समाेर आला. त्‍याच वेळी माेदी यांनी सरकार यापुढे स्‍मारकाबाबतील लक्ष देणार नाही. असे स्‍मारकासाठी निधी देणार नाही, असे जाहीर केले. देशात अनूसूचित जातीवर अन्याय हाेत असतानाही त्‍यांच्या संरक्षणासंदर्भात ते ब्र ही काढत नाहीत.
१४ एप्रील २०१५ राेजी बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. दरम्‍यान ते उपस्‍िथत नव्हते. तसेच लहान माेठ्‌या कार्यक्रमांची पान भरून वर्तमान जाहीरात देणारे केंद्र सरकाने बाबासाहेबांच्या अभ्‍िावानदाची जाहीरात दिली नाही. प्रश्‍न जाहीरात का दिली असा नाही. जाहीरात दिल्‍यामुळे बाबासाहेब महान हाेतील, असेही नाही. ते महान आहेत. यासाठी जाहीरात दिली गरज नाही. मात्र, अशा नेत्‍यांना आठवण म्‍हणून तसेच त्‍याचे कार्य लाेकांपर्यत पाेहाेचविण्याठी अशा माध्यमाची गरज असते. तेच माेदी सरकारने केले नाही. महाराष्‍ट्रात असे प्रकार हाेत असले तरी येथील चळवळीत काम करणा-यांच्या लाॅबीमुळे. यातून मतपेढी हा तेवढा उदृदेश आहे. राेज एक हजार कायदे बलविणारे हे सरकार आहे. यामुळे यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवू नये. मात्र, चूक दिसेल तर ते बाेलेले पाहीजे, असे मला वाढते. कदाचित देशातील इतर राज्‍यातील काही वृत्‍तपत्रात दिसल्‍या असतीलही पण नागपूरातील मुख्य वृत्‍तपत्रात जाहीरातील दिसल्‍या नाहीत, त्‍यासाठी हा प्रपंच. म्‍हणूनच बाबासाहेब आंबेडकरविराेधी काेण?, असा प्रश्‍न उपस्‍थित केला.
चंद्रशेखर महाजन
9850209710

Friday, 17 April 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ कधी संपणार नाही

अांबेडकरी चळवळीविष्‍ायी प्रस्‍थ्‍ाापित नेत्‍यांमध्ये नेहमी नकाराची भ्‍ाूमिका राहीली आहे. आधी राजकारण,यातून सत्‍ता नंतर चळवळ अशी उलट दिशा राहीली आहे. त्‍याचे परिणामही आपल्‍याला दिसत आहेत. जाहीर भाष्‍ाणात किंवा सार्वजनिक ठिकाणी हे प्रस्‍थ्‍ाापित नेते चळवळ संपल्‍याचे जाहीर करतात. यांना ऐवेढही समजत नाही की, संपलेल्‍या व्यक्‍ती किंवा संघटनेच्या मागे काेणीही उभ्‍ाा राहत नाही. म्‍हणून त्‍यांना कार्यकर्ते किंवा युवक संघटनेसाठी येत नाही. त्‍यांच्या मधील ही नकारघंटा चळवळ संथ करण्यास जबाबदार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ कधी संपणार नाही. त्‍याचे शिलेदार बदलतील. काही काळात ही चळवळ संथ झाली हे मान्य करावे लागेल. मात्र, जाहीर भाषणात चळवळ संपली असे जाहीर करण्याऐवढी चळवळ मागे गेलेली नाही. त्‍याचे उदारहण भरपूर देता येईल. माझा फायदा झाला नाही किंवा सत्‍तेत वाटा मिळाला नाही म्‍हणून चळवळ संपली म्‍हणणा-यांची संख्या अधीक आहे.युवा पिढीला सत्‍ता आवडते.मात्र, ती आधी चळवळ, त्‍यातून राजकारण नंतर सत्‍ता अशा प्रकारच्या माध्यतातून. चळवळ म्‍हणजे फक्‍त रस्‍त्‍यावर येवून आंदाेलन करण्यापूरती नव्हेतर ती शिक्षण,धम्‍म, बाौध्द विचार व प्रसार, त्‍याची माध्यमे, समाजकारण याही पेक्षा अधीक व्यापक. युवा पिढीला नियाेजनबध्द चळवळ हवी आहे. फक्‍त १४ एप्रीलला भाष्‍ाण देण्यापूरती नव्हे. काही युवकांनी मते जाणून घेतली तेव्हा ब-याच बाबी समाोर आल्‍या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अगोदरपेक्षा अधिक प्रखर झाली आहे. ती प्रत्येकांच्या मनामनात ठासून भरलेली आहे. त्यांच्या नावावर उभ्या झालेल्या संघटनांमध्ये मात्र, फाटाफुट आहे. याबाबात आंबेडकरी तरूणांनी चिड व्यक्‍त केली. नेत्यांनी व्यक्‍तीगत स्वार्थ सोडावा, समाजाचा स्वार्थ अंगीकारावा असेही आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असे आवाहन केले होते. त्यानुसार सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध संघटना स्थापन झाल्या. त्या संघटनांबाबत आंबेडकरी तरूणांचे प्रतिक्रीया जाणून घेतल्या असता बहुतेकांनी संघटनांचा उल्लेख नेत्यांच्या दुकानदा-या असा केला. आणि फाटाफुटीबाबत चिड व्यक्‍त केली. सोबतच बाबासाहेबांची चळवळ संपली नाही, ती जिवंत आहे, असेही ठाम विधान केले.
यासंदर्भात शेकडो तरूणांची मते जाणून घेतली त्यापैकी काहींच्या निवडक प्रतिक्रीया खालील प्रमाणे आहे.
बाबासाहेबांनी भारतीयांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे. पण, त्यांच्यानंतर चळवळीची दुरवस्था झाली आहे. त्याला नेते जबाबदार आहेत. दुरदुष्टी अभावी चळवळ भरकटली आहे. ऐवढेच नव्हे तर नेत्यांचा स्वार्थ या चळवळीच्या प्रगतीला आड येत आहे. आंबेडकरी जनतेसोबत नेत्यांनी केलेला विश्‍वास घात आता लोकांच्या लक्षात आला आहे. यामुळे नेत्यांची दुकानदारी बंद करणे आणि निकोप युवा कार्यकर्ते निर्माण आवश्‍यक आहे, अशी प्रतिक्रीया चंद्रपूर जिल्हयात मासळ येथील प्रा. नरेंद्र मेश्राम यांनी दिली.
तर नागपूरच्या न्यू कैलाश नगर येथील अजित नगरकर हा युवक म्हणाला, बाबासाहेबांची चळवळी संपली अशी जी ओरड होत आहे. ते मुळातच चुकीची आहे. नेत्यांची दुकानदारी धोक्‍यात आल्याने असा भ्रामक प्रचार केला जात आहे. चळवळ जीवंत आहे. प्रत्येकांच्या नसानसात आहे. बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये युवक हिरहिरीने भाग घेताना दिसून येत आहे. चळवळीच्या प्रचाराची व्याप्ती बदललेली आहे. यामुळे नेत्यांची कुचंबणा होत आहे. यातून असा भ्रामक विचार समाजात पेरत आहे. अशा नेत्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे, असे त्याने सूचित केले.
शताब्दीनगर येथील मृणाल वाचनेकर म्हणाली, नेत्यांना किंवा संघटनांना दोषी ठरविण्यापेक्षा प्रत्येकांनी स्वतःला तपासले पाहीजे. कारण संघटना किंवा पक्ष हे लोकच चालवितात. यामुळे लोकांनी फक्‍त एक किंवा दोन नेत्यांना दोषी ठरविणे योग्य नाही. बाबासाहेबांची चळवळीला ख-या अर्थाने जोम आला आहे. फक्‍त समाजपुरती असलेली चळवळी आता सर्वस्तरामध्ये जात आहे. फक्‍त त्याचे नेतृत्व बदलेले आहे. हाच आपल्या समाजाचा दोष आहे.
तर अमरावती येथील राहूल वानखेडे म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीला दिशा देण्याची जबाबदारी आता युवकावर आली आहे. युवकाने ही जबाबदारी खांद्यावर घ्यावी. संघटना आणि नेत्यांच्या मागे न धावताला स्वतः ऍजेंडा तयार केला पाहीजे. फेसबुक आणि तर माध्यम आहेत. त्याचा चळवळीसाठी वापर केला तर चळवळीला चांगले दिवस येतील, अशी आशाही त्याने व्यक्‍त केली.
चंद्रशेखर महाजन
माे.९८५०२०९७१०