Pages

Friday, 15 May 2015

नशीब अपना, अपना

नशीब अपना, अपना

दिल्ली निवडणुकांच्या प्रचार धुमाळीत एकमेकांवर टिका करताना नैतिकता पाळली जात नाही. नैतीकता सोडून सर्व काही राजकारणात चालते. 2014 मध्ये देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. दुस-या भाषेत सांगायचे तर सुन्मानी आली. 60 वर्षे देशावर कमी अधिक प्रमाणात राज्य करणा-या कॉंग्रेस पक्षाला पळता भूई थोडी झाली. युवकांचे आयकॉन नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. कॉंग्रेसवर आणि इतर पक्षांवर सडकून टिका करणारे मोठी सर्वांना परिचित आहेत. महागाईच्या मुद्यावर त्यांनी कॉंग्रेसला सडो की पळो करून सोडले. कायम टिकाशस्त्र सोडून कॉंग्रेसला त्यावेळी जेरीस आणले. लोकांनाही मोदीची भुरळ पडली. भाजपचा उमदेवार म्हणून नाही तर हा माणूस देशात मोठी प्रगती करेल, असा प्रत्येकांना वाटत होते. आताही लोकांना वाटत आहे. महागाईच्या मुद्यावर कॉंग्रेसला चारीमुंडया चित करणारे मोदी प्रत्यक्षात सत्ता आणल्यानंतर महागाई कमी करण्याऐवजी वाढवत आहेत.
दिल्लीमध्ये सरकार स्थापन करत असताना आखाती देशामध्ये इंधनाच्या किमती मोठया प्रमाणात घसरल्या. याचा फायदा असा झाला की, देशातील इंधनाच्या किंमती मोठया प्रमाणात घसरल्या. त्याचा लाभ पूर्णपणे लोकांना मिळायला हवा होता. मात्र, उद्योगधर्जिण्या मोदी सरकारने यावेळी इंधन कंपन्यांना झुकते माफ दिले. तोटा होत आहे म्हणून नेहमी ओरड करणा-या कंपन्यांच्या करामध्ये वाढ केली. यामुळे 50 ते 55 रूपयांपर्यंत कमी होणारे पेट्रोल फक्‍त पाच ते सहा रूपये कमी झाले. याचा फायदा दिल्ली निवडणुकीमध्ये घेण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. कॉंग्रेस आणि केजरीवाल यांच्यावर टिका करताना आपण पेट्रोलच्या किंमती मोठयाप्रमाणात कमी केल्याचा दावा त्यांनी केला. कॉंग्रेसवर टिका करताना स्वतःच्या नशीबावर ते बोलतात. खरचं मी 125 कोटी लोकांचे नशीब घेवून आलो, असे त्यांनी ठामपणे सांगीतले. पण, त्यांच्या या भुलथापाचा परिणाम दिल्ली मतदारांवर झाला नाही. शेवटी भाजपला फक्‍त तीन जागा मिळाल्या. त्यानंतरही मोदी काही तरी कमाल करतील, असे लोकांना वाटत आहे. मात्र,यानंतर त्यांनी भुसंपादन विधेयक समोर आणले. शेतक-यांना आत्महत्या करणा-या प्रवृत्त करणारे व त्यांना उद्योजाकांना पोषण असे ते विधेयक असल्याची टिका झाली. त्याचे परिणाम असा की, त्यांना भूमिअधिग्रहण विधेयकासंदर्भात तीन वेळा अध्यादेश काढण्याची वेळ आली. भूमिअधिग्रहण विधेयकावरून मोदी प्रतिमा मोठयाप्रमाणात डागाळलेली.
यात या महिन्यामध्ये पेट्रोलच्या किमती दोन वेळा वाढल्या. त्या थोड्‌याथोडक्‍या नव्हे तर साडे सात रूपयांनी वाढल्या. याचा परिणाम महागाई मोठयाप्रमाणात वाढत आहे. लोक महागाईला त्रस्त झाले आहेत. हे विकलेला मिडिया दाखवू शकत नसला तरी लोकांच्या मनामध्ये मोठा उद्रेक आहे. तो उद्रेक दिल्ली निवडणुकीत दिसून आला. येणा-या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम जाणवेल यात शंका नाही. कॉंग्रेसवर टिका करता मोदींना मारेमाप प्रसिध्दी देणारा मिडिया मात्र, यावर मुगगिळून बसला आहे.
देशातील अल्पसंख्यांक, आदिवासी, दलित यांच्या सरंक्षणाचा मुद्‌दाही शिल्लक आहे. खिश्‍चन, मुस्लीम आणि दलितांवर मोठयाप्रमाणात हल्ले आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहेत. यावर अंकुश घालण्यात सध्या तरी मोदी अपयशी ठरले आहेत. मागासवर्गीयांच्या निधीमध्ये 40 टक्‍के कपात केली. याचा परिणाम त्यांच्या विकास होणार आहे.
परराष्ट्र धोरणासंदर्भात समाधान व्यक्‍त करता येईल. परराष्ट्र धोरण महत्वाचे असले तरी देशाअंतर्गत जी अस्थिरता निर्माण होत आहे. त्याकडे मोदी सरकारे लक्ष नाही. आता ज्या देशाला भेटी दिल्या. त्याचे रिजल्ट मिळण्यास वेळ लागेल. आशीयायी देशाची बॅक काढली. त्याला प्रोत्साहन दिले. चांगले झाले.पहिला अध्यक्ष भारताचा झाला. मुद्रा बॅंक सारखी महत्वाची धोरण स्वीकारले. हे विकासासाठी चांगले आहे. मात्र, त्याच बरोबर सामाजिक समातोल राखण्याची जबाबदारीही त्यांची आहे. पण, ते त्यांच्याकडून होताना दिसून येत नाही. यामुळे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी दिल्ली भेटीनंतर त्यांना मोदींना कानपिचक्‍या दिल्या.मोदी सरकारला आता एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा लेखाजोखा घेणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात पोकळ आश्‍वानाशिवाय फार काही लोकांच्या हाती लागले नाही. महागाईचा मुद्‌दा तोच आहे. भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. मंत्रीमंडळातील मंत्र्‌यांचे बेताल वक्‍तव्य सुरूच आहे. अशा स्थितीमध्ये मी 125 कोटी लोकांचे भविष्य आहे, असे जर मोदी म्हणत असतील तर या देशातील 125कोटी लोकांचे हे दुदैव आहे.
चंद्रशेखर महाजन
9850209710

Tuesday, 12 May 2015

बसपला रिपाइंची लागण

बसपला रिपाइंची लागण


समाजाला राजकीय सरंक्षण मिळावे आणि यातून विकास साधावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाला महत्व दिले. म्हणूनच त्यांनी हयातीमध्ये कामगार पक्ष आणि शेडयुल कास्ट फेडरेशन सारख्या पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाला चांगले दिवस दाखविले. शेडयुल कास्ट फेडरेशनचे एका काळामध्ये 15 आमदार मुंबई प्रातांतून निवडून आले होते. मात्र, शेडयुल कास्ट फेडरेशन पेक्षा सर्वसमावेशक असलेला पक्ष त्यांना हवा होता. म्हणून त्यांची पंजाबराव देशमुख यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांची चर्चा करून भारतीय रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. मात्र, दरम्यान त्यांचे महापरिनिर्वाण झाले. आणि रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला तो यशवंतराव आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, बॅरिॅस्टर राजाभाउ खोब्रागडे आणि इतर नेत्यांच्या संकल्पातून. सुरूवातीपासून हा पक्ष फुटीच्या उंबरठयावर राहीला. दादासाहेब गायकवाड आणि राजाभाउ खोब्रागडे यांच्यामध्ये मतभेद झाले. पक्ष फुटला. बॅरि. खोब्रागडे यांनी खोरीपा काढला. आजही तो पक्ष फक्‍त निवडणुकापुरता जिवंत आहे. यानंतर या पक्षाला फुटीचे ग्रहण लागले. ते आजतागायत सुटले नाही. गल्लीगल्लीमध्ये रिपाइं नावाचे राष्ट्रीय पक्ष झाले आणि दहा लोक त्यांच्या मागे नसतांनाही नेते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सर्वच पक्ष बाबासाहेबांच्या विचारावर निवडणुका लढवित आहेत. मात्र, त्यांचा एकही लोकप्रतिनिधी विधानसभेत नाही. 80 च्या दशकामध्ये मा. कांशीराम नावाचा झंझावात महाराष्ट्रात उदयास आला. पुणे येथील सरकारी नोकरी सोडून त्यांनी बाबासाहेबांचे विचार सर्वत्र पेरण्याची महत्वाकांशा घेवून कांशीराम महाराष्ट्रातील गल्लोगल्लीत सायकलने फिरले. रिपाइं नेत्यांना शिव्याशाप दिल्या.मात्र, ना नेते एक झाले आणि नाही जनता पुढे आली. शेवटी त्यांनी बसप नावाचा पक्ष स्थापन केला. बामसेफ नावाच्या कर्मचारी संघटनांनी त्याला भरभरून आर्थिक मदत केली. महाराष्ट्रात पाय रोवता येत नाही म्हणून त्यांनी युपी आणि पंजाब राज्यामध्ये पक्ष बांधणीला सुरूवात केली. महाराष्ट्रातील रसद घेवून त्यांनी युपीमध्ये पक्ष बांधला. लोकांनाही पक्ष आवडला आणि बसपचे कॅडरबेस तयार झाले. गावागावांमध्ये कॅडर झाले. मात्र, त्यांनाही महाराष्ट्रात 30 वर्षांनंतरही राजकीय यश आले नाही. उत्तर प्रदेशात मायावती पाचदा मुख्यमंत्री झाल्यात. दिल्ली, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश या ठिकाणी त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आले. महाराष्ट्रात मात्र, त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्यावर छाप पाडता आली नाही.
अनेक वर्षे पक्षात काम करूनही एकही आमदार निवडून येत नाही. यामुळे बसपचे नेते सैरभर झाले. त्यांच्यातही फुट पडली. श्रीकृष्ण उबाळे सारखे नेते त्यांच्यापासून दूर झाले. पक्ष स्थापनेतील अनेक नेते बसपपासून दूर झाले. ओबीसींना एक करण्यासाठी महाराष्ट्रातील बसपचे बौध्द कार्यकर्ते कामाला लागले. मात्र, गेल्या निवडणुकीमध्ये जो ओबीसी जनाधार होता तो सुध्दा त्यांच्याकडे राहीला नसल्याचे स्पष्ट झाले. देशात 19 खासदारपर्यंत मजल मारलेल्या बसपला एकही खासदार निवडून आणता आला नाही. मात्र, ओबीसींना जागे करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्रातील जो काही बौध्द मतदार होता तो सुध्दा त्यांच्यापासून दूर होत आहे. समाजातील लोकांना संघटीत करण्याचे सोडून सोशल इंजिनिअरिंग केले. मात्र, ते सर्वत्र फसल्याचे दिसून येते. युपीतील सत्ता सोशल इंजिनिअरिंगमुळे आली असेल यात शंका वाटत आहे. पक्षाला बेस हवा आहे. मात्र, बसपला महाराष्ट्रात अद्यापही बेस तयार करता आला नाही. फक्‍त निवडणुकीपुरता उगविणारा पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे. समाजाच्या प्रश्‍नांवर कधी तो मैदानात उतरला नाही. मोर्चे, आंदोलन करून सत्ता मिळत नाही किंवा प्रश्‍न सुटत नाही, असा त्यांचा विचार आहे. आधी सत्ता द्या, नंतर प्रश्‍न सोडवितो, असे त्यांचे श्रेष्ठी सांगतात. यामुळे समाज त्यांच्यावर नाराज आहे. सध्या बसपची अवस्था "ना घरकी ना घाट' झाली आहे. ज्या समाजाच्या भरोश्‍यावर राजकारण करीत होते त्यांचे प्रश्‍न सोडविता आले नाही. तसा दबावगटही तयार करता आला नाही. ओबीसींना संघटीत करण्याचे त्याचे प्रश्‍नही फळास आले नाही. ओबीसी नेते त्यांच्याकडे भरपूर आहेत. मात्र, ते नेते स्वतःच्या घरातील मते बसपला मिळवून देण्यास अपयशी ठरले आहेत. ओबीसी नेत्यांना बसपमध्ये का गेले म्हणूनच घरूनच मोठयाप्रमाणात विरोध होतो आहे. त्याचा परिणाम 2014 मध्ये देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून दिसून आले. "जात नाही ते जात' प्रत्येकांच्या डोक्‍यात असल्याने बसपही या"जात'पासून सुटला नाही. त्याचे परिणाम समोर आहेत.
बसपचा पाया मजबूत करणारे नागपूर. महानगर पालिकांमध्ये त्यांचे 10 नगरसेवक आहे. पूर्वी 12 होते. पण, गेल्या काही दिवसांपासून बसपला रिपाइंची लागण झाली. नगरसेवक किशोर गजभिये, असो डॉ. माने असो. यापूर्वीही ही लागण झाली. मात्र, श्रेष्ठीपुढे कोणीही मोठा नाही, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी होते. आता उघउउघड रिपाइं होत आहे. फक्‍त रिपाइं सारखे बसप(एम) किंवा बसप(जी) तसेच अनेक कंशातील नावे लागणे फक्‍त शिल्लक आहे. सध्या बसपचा हत्ती धोक्‍यात आहे. यामुळे त्याचे फायदा हे फुटीर नेते घेण्यास मागे पुढे पाहाणार नाहीत.
नगरसेवक किशोर गजभिये किवा डॉ. माने आणि इतर त्यांसोबत किंवा त्या नेत्यांनी जो प्रकार सुरू केला आहे. तो बसपला पुन्हा मागे घेवून जाणारा आहे. 30 वर्ष पक्षासाठी काम करूनही सत्ता मिळत नसल्याचे नेते हताश झाले आहेत. काळयाचे पांढरे झाले. पण, साधे नगरसेवक होता आले नाही, याची खंत त्यांना आहे. ऐवढेच काय तर आमदार किंवा खासदारकीची उमदेवारी मिळाली तरी बरे म्हणणारे कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही, याची खंत आहे. कारण ऐववेळी उमेदवार आयात करण्याची बसपची खेळी त्यांच्यावर उलटत आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण पक्षाची उमेदवारी मिळाली असती तर बरे झाले असते, असे म्हणणा-यांची संख्या वाढत आहे. अशा नैराशातून कार्यकर्ते वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याचे परिणाम बसपला आज दिसणार नाहीत. मात्र, भविष्यात ते दिसून येतील. तेव्हापर्यंत फार उशीर झालेला असेल. बसपची रिपाइंपासून सुटका करायची असेल तर आत्ताच सावध झालेला बरे. पक्षात हेवेदावे असतात. यात वाद नाही. मात्र, ते पक्षाबाहेर दिसायला नको.
-चंद्रशेखर महाजन
9850209710