प्रदीप' नावाच वादळं विसावलं
प्रदीप भानसे गेला. यावर तरी माझा सध्या विश्वास बसत नाही. मात्र, हे वास्तव आहे. प्रदीप भानसे यांच्यासोबतचे दोन वर्षांतील संबध. यातील एक वर्षे फक्त कधी-काळी भेट झाली, तर कुठल्या तरी चहाटपरीवर चहा घेण्यापूरते. चहा पितांना समाजातील प्रश्नांवर बेशुट बोलणारा प्रदीप तेव्हा मी अनुभवला. प्रश्न सुटत नाही म्हणून तेवढाचं स्वतःवर आणि समोरच्यांवर चिडणारा प्रदीप. गेल्या वर्षभरापासून आठवड्यातून किमान पाच दिवस तरी त्यांच्यासोबत बोलत असे. काय चंदू. असे सहजं बोलून पटकन निघून जाणारा प्रदीप भाऊ. पत्रकारितेमध्ये मी सहसा कुणाला भाऊ म्हणतं नाही. तशी मला सवय नाही. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये कमी-कमी दहा वेळा तरी "मजेत' प्रदीपभाऊ म्हणून त्यांच्यासोबत बोललो. का बोललो माहीत नाही. दरम्यान प्रदीप भाऊची प्रकृती खालावतांना दिसली. एक दिवस न राहवून प्रदीप भाऊला बोललो. तब्येतीची काळजी घ्या. खुर्ची समोरून सहज निघून जात "चंदू, टेन्शन नको घेऊ' पोटात काही तरी गडबड असल्याचे तो बोलला.28 ऑगस्टला सायंकाळी रक्षाबंधन कार्यक्रमाकरिता कार्यालयात कर्नल देशपांडे आले. त्यांच्यासोबत ग्रुप फोटो काढला. यात प्रदीप भाऊपण होते. हा त्यांचा आणि आमच्या कार्यालयातील सहका-यासोबतचा कदाचित शेवटाचा फोटो असेल. त्यानंतर प्रदीप भाऊ कार्यालयात दिसले नाही. नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्यामुळे मी चौकशी केली नाही. यापूर्वीसुध्दा मी चौकशी केली नव्हती. त्यामुळे रूटीन सुरू होते. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. रात्री 12.15 च्या सुमारास त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो. प्रकृती गंभीर होती. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉक्टरांनी सांगील्याचे माहिती मिळाली. पण, रात्री एक नंतर प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळले. शनिवारी सहका-यांना विचारपूस केली, तेव्हा उपचारासाला प्रतिसाद देत असल्याचे सांगीतले. त्यामुळे प्रदीप भाऊ काही दिवसांत बरे होतील, असे विश्वास निर्माण झाला. पण, रविवारी सकाळी मोबाईलवर माझे सहका-यांनी पाठविलेला मॅसेज बघितल्यानंतर धक्काच बसला. प्रदीप भाऊ गेल्याचा तो मॅसेज होता.
अंत्यत कमी वयात पत्रकारितेमध्ये नाव कमविणारे प्रदीप भाऊ. त्यांचे सामाजिक क्षेत्रातही योगदान होते. समाजासाठी लढणारे लढवय्ये होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे, हे त्यांच्या अंत्यसंस्कारला आलेल्या गोतावळयावरून दिसून आले.माझा एक चांगला सहकारी आणि भावासमान मित्र गमविल्याचे दुःख मला आहे.
लढवय्ये पत्रकार प्रदीप भाऊ भानसे यांना अखेरचा सलाम. अश्रूपर्ण श्रध्दांजली.